“आमच्या महाराजांबद्दल गरळ ओकणं बंद कर…” ; चित्रा वाघ यांनी स्वरा भास्करला दिले सडेतोड उत्तर

Chitra Wagh on Swara Bhaskar । बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही सतत तिच्या विधानांमुळे वादात अडकल्याचे पाहायला मिळते. त्यातच तिने आणखी एक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. काल छत्रपत्री शिवाजी महाराजांची जयंती राज्यासह देशभरात उत्साहात साजरी होत असताना स्वरा भास्कर हिने एक ट्विट केले. त्यात महाकुंभमेळा, दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेली चेंगराचेंगरी आणि छावा चित्रपटावरून वादग्रस्त विधान केले आहे. तिच्या या विधानाला आता भाजपाच्या आमदार चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
स्वरा भास्कर यांना कुठे काय बोलायचं याचं तारतम्य उरलं नाही हे नक्की…
दिल्लीमध्ये चेंगराचेंगरी होऊन दुर्दैवी मृत्यू झाले ही घटना खरंच क्लेशदायक होती .. आणि आहे.
पण त्या घटनेचा आमच्या राजाशी सांगड घालण्याची काहीही गरज नव्हती.
स्वरा भास्कर आमचे छत्रपती संभाजी राजे हे…
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 20, 2025
तुमच्या सारख्या मुर्दाड मनाच्या लोकांची आता कीव Chitra Wagh on Swara Bhaskar ।
स्वरा भासकर हिने केलेल्या विधानावर चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. यासाठी त्यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये चित्रा वाघ यांनी, “स्वरा भास्कर यांना कुठे काय बोलायचं याचं तारतम्य उरलं नाही हे नक्की. दिल्लीमध्ये चेंगराचेंगरी होऊन दुर्दैवी मृत्यू झाले ही घटना खरंच क्लेशदायक होती आणि आहे. पण त्या घटनेचा आमच्या राजाशी सांगड घालण्याची काहीही गरज नव्हती. स्वरा भास्कर, आमचे छत्रपती संभाजी राजे हे काल्पनिक नव्हते. त्यांच्यावरती क्रूर अत्याचार करणारा औरंग्यादेखील काल्पनिक नव्हता हे तर तू मान्य करशीलच. त्यामुळेच आमच्या राजावरती होणारे अत्याचार पाहून प्रत्येक संवेदनशील मनाला त्रास झाला आणि त्या औरंग्याचा प्रचंड राग आला. त्यामुळेच प्रत्येक भारतीयाला हा इतिहास समजायलाच हवा, जो तुमच्यासारख्या निष्ठूर आणि मेलेल्या मनाच्या लोकांनी सोयीने बदलला. आजही जेव्हा सत्य समोर येतंय, खरा इतिहास लोकांना कळतोय, तेव्हा तुम्हाला आणि तुमच्यासारख्या अनेकांना पोटशूळ का होतोय? हे समस्त भारतीयांना चांगलंच उमगलंय. त्यामुळेच आमच्या महाराजांबद्दल गरळ ओकणं बंद कर. तुमच्या सारख्या मुर्दाड मनाच्या लोकांची आता कीव येऊ लागली आहे,” असे म्हणत त्यांनी स्वरा भास्करला चांगलेच सुनावले आहे.
A society that is more enraged at the heavily embellished partly fictionalised filmy torture of Hindus from 500 years ago than they are at the horrendous death by stampede & mismanagement + then alleged JCB bulldozer handling of corpses – is a brain & soul-dead society. #IYKYK
— Swara Bhasker (@ReallySwara) February 18, 2025
काय म्हणाली होती स्वरा भास्कर? Chitra Wagh on Swara Bhaskar ।
“व्यवस्थापनातील अभावामुळे चेंगराचेंगरीत लोकांचे भयावह मृत्यू झाले. बुलडोझरच्या मदतीने त्यांचे मृतदेह काढावे लागल्याचे सांगितले गेले. यावर चिंता न व्यक्त करता समाज ५०० वर्षांपूर्वी हिंदूंवर झालेल्या काल्पनिक फिल्मी अत्याचारांवर जास्त संताप व्यक्त करतोय. हा समाज मनाने आणि आत्म्याने पूर्णपणे मुर्दाड बनलाय,” असे स्वराने सोशल मीडियावर लिहिले होते.





