Chirag Paswan on Waqf Bill । वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय १६ एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी, जमियत उलेमा-ए-हिंद, काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांच्यासह १५ जणांनी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. यावर लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास पासवान) प्रमुख आणि खासदार चिराग पासवान यांनी,”विरोधी पक्ष मागील कायद्याचे रक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेत आहेत, परंतु असे किती मुस्लिम होते जे या कायद्याविरुद्ध न्यायालयातही जाऊ शकले नाहीत हे पाहणे देखील गरजेचे आहे. असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. विरोधक प्रत्येकवेळी चुकीचे ठरले Chirag Paswan on Waqf Bill । एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या एका कार्यक्रमात चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी वक्फ सुधारणा कायदा आणि त्याविरुद्ध विरोधकांच्या निषेधाबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी, नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) असो किंवा कलम ३७० हटवणे असो, विरोधकांनी प्रत्येक वेळी निषेध केला, परंतु ते चुकीचे सिद्ध झाले.” असे त्यांनी म्हटले. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “सीएए हा शेजारील देशांमध्ये छळ झालेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आणण्यात आला होता, त्याबाबत विरोधकांनी चुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला की त्याचा उद्देश नागरिकत्व हिसकावून घेणे आहे. मात्र, त्यांच्या योजना काही कमी आल्या नाहीत. असेही त्यांनी म्हटले. चिराग पासवान यांनी या कार्यक्रमात, “जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या बाबतीतही असेच करण्यात आले होते, परंतु याठिकाणी अलिकडच्या विधानसभा निवडणुकीत विरोधक चुकीचे असल्याचे सिद्ध झाले. कलम ३७० बद्दल ते भाकीत करत होते, पण नॅशनल कॉन्फरन्स जिंकली आणि ओमर अब्दुल्ला पुन्हा मुख्यमंत्री झाले.” असे म्हणाले. कालांतराने लोकांना समजेल हा कायदा योग्यच Chirag Paswan on Waqf Bill । चिराग पासवान म्हणाले की, आता विरोधकांचा वक्फ दुरुस्ती कायद्याबाबत तोच प्रचार आहे, परंतु कालांतराने लोकांना समजेल की वक्फ दुरुस्ती कायदा योग्य आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी आहे. ते म्हणाले, ‘तुम्ही (विरोधी पक्ष) जुन्या कायद्याचे रक्षण करण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आहात, परंतु असे अनेक खटले आहेत जे मागील कायद्याविरुद्ध न्यायालयातही जाऊ शकले नाहीत.’