चिन्मय दास यांना दिलासा नाहीच; बांगलादेश न्यायालयाने नाकारला जामीन

Chinmay Das Arrest | बांगलादेशमध्ये चितगाव न्यायालयाने देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले हिंदू नेते आणि इस्कॉनचे सहयोगी चिन्मय कृष्णा दास यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. दास यांनी न्यायालयात ऑनलाइन उपस्थिती लावली. तर बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाचे वकील अपूर्व भट्टाचार्य आणि अन्य 10 जण चिन्मय दास यांच्या बाजूने न्यायालयात हजर झाले होते.
न्यायालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले, महादंडाधिकारी महंमद सैफुल इस्लाम यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुमारे 30 मिनिटांनी जामीन अर्ज फेटाळला. बांगलादेशातील चिन्मय दासचे प्रतिनिधीत्व करणारे वकील रवींद्र घोष यांना सुनावणीपूर्वी मंगळवारी संध्याकाळी एसएसकेएम रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभागात दाखल करण्यात आले. आम्ही हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित ध्वज बांगलादेशचा राष्ट्रीय ध्वज नसल्याने त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत, अशी बाजू दास यांच्या वकिलांनी मांडली. दास यांच्या जामिनाला सरकारी वकिलांनी विरोध केला. दास यांच्या अटकेनंतर 26 नोव्हेंबर रोजी त्यांचा जामीन नाकारण्यात आला होता. या प्रकरणावर सुनावणी लवकर घ्यावी, अशी मागणी करणारी याचिकाही 11 डिसेंबर रोजी न्यायालयाने फेटाळून लावली होती. Chinmay Das Arrest |
कोण आहेत चिन्मय कृष्णा दास ?
चिन्मय दास हे पूर्वी ‘इस्कॉन’शी संबंधित आहेत. सध्या ते बांगलादेश सम्मिलिता सनातनी जागरण संघटनेचे प्रवक्ते होते. ते बांगलादेशातील हिंदू लोकसंख्येचा एक प्रमुख चेहरा असून सतत हिंदूंशी संबंधित मुद्दे मांडतात. इस्कॉनची बांगलादेशात 77 हून अधिक मंदिरे आहेत आणि 50,000 हून अधिक लोक त्यांच्याशी संबंधित आहेत.
चिन्मय दास यांच्यावर कोणता आरोप करण्यात आला?
२५ नोव्हेंबर रोजी ढाका येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी देशद्रोहाच्या आरोपाखाली दास यांना अटक झाली होती. त्यांच्या अटकेनंतर भारत आणि बांगलादेशात निदर्शने सुरू झाली. Chinmay Das Arrest |
‘इस्कॉन’ची प्रतिक्रिया
चिन्मय कृष्णा दास यांना जामीन नाकारल्यानंतर कोलकातामधील ‘इस्कॉन’चे प्रवक्ते राधाराम दास यांनी सांगितले, की दास यांचा जामीन नाकारला, हे दु:खद आहे. नव्या वर्षात त्यांची मुक्तता होईल, अशी आशा वाटते, असे सांगितले. Chinmay Das Arrest |
हेही वाचा:
धनंजय मुंडेंच्या जागी मंत्रिपद मिळणार का? परदेशातून येताच छगन भुजबळ म्हणाले…




