उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत चिंकारा जातीच्या हरणाची शिकार

Updated On:

बारामती : बारामतीत पारवडी वन परिक्षेत्रात आज सकाळी चिंकारा जातीच्या हरणाची शिकार झाल्याचे समोर आले आहे.. ही शिकार मेजवानीसाठी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.. जैनकवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी जागरुकता दाखवल्याने शिकार करणाऱ्या संबंधित आरोपीचा मेजवानीचा बेत फसला आहे… लॉकडाउन मध्ये पार्टीसाठी चिंकारा हरणाची शिकार केल्याची चर्चा रंगली आहे.. मात्र यात चिंकारा हरणाला आपला जीव गमवावा लागला आहे या सर्व घटनेची वनविभागाला माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करत अज्ञात व्यक्तीविरोधात वन्यप्राणी संरक्षण कायदा 1972 कायद्यानुसार शिकारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात केला आहे.. शिकार करणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

यापूर्वी याच बारामतीत चिंकारा प्रकरण खूप गाजले होते तत्कालीन मंत्री बाबा आत्राम यांनीही याठिकाणी शिकार केली होती.. एमआयडीसी परिसरालगत वंजारवाडी,कटफळ, जैनकवाडी हा परिसर येत असल्याने एमआयडीसी आणि बारामती परिसरातून अनेक जण शिकारीसाठी नेहमी येत असल्याचा संशय येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे..
धक्कादायक म्हणजे या शिकारीत कुत्र्याचा वापर करून चिंकारा हरणाची भरदिवसा शिकार झाल्याचं उघड झाले आहे .. लवकरात लवकर आरोपीचा शोध जाईल असे वन परिक्षेत्र अधिकारी त्रिंबक जराड आणि वनरक्षक अर्चना कवितके यांनी सांगितले आहे..

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

2026-10-05 12:29:01

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

2026-10-04 19:35:02

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

2026-10-04 11:24:34

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती