Taiwan-China: चिनी युद्धनौका आणि विमानांनी ‘तैवान’ला घेरले; लष्करी प्रशिक्षण युद्ध खेळात बदलण्याची भीती

तैपेई – चीनच्या गुप्त लष्कराच्या तैवानच्या भोवताली काही हालचाली सुरू असल्याचे दिसते आहे. मात्र या गुप्त लष्कराच्या हेतूंबद्दल काहीही स्पष्ट झालेले नाही. चीनच्या नौदलाची सुमारे डझनभर जहाजे आणि ४७ लष्करी विमाने गेल्या २४ तासात आढळली आहेत.
मात्र चीनच्या जहाजांनी यापूर्वी युद्धसरावाच्यावेळी जसा प्रत्यक्ष गोळीबार केला होता, तसा यावेळी करण्यात आलेला नाही, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तैवानचे अध्यक्ष लाय चिंग यांनी अलिकडेच हवाई आणि गुआम या अमेरिकेतल्या भूभागांना बेट दिली होती. त्याची प्रतिक्रिया म्हणून चीनकडून असा युद्धसराव केला जातो आहे.
मात्र ही जहाजे आणि विमाने नक्की कशासाठी तैनात केली गेली आहेत, हे चीनकडून अद्याप स्पष्ट केले गेलेले नाही. हा चीनच्या प्रशिक्षणाचा भाग असावा, असे तैवानच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. लष्करी प्रशिक्षणाचे रुपांतर युद्धसरावात होऊ शकते आणि सरावाचे रुपांतर प्रत्यक्ष युद्धामध्येही होऊ शकते, असेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
तैवानचे अध्यक्ष लाय चिंग हे फुटिरवादी असल्याची टीका चीनकडून केली जाते आहे. मे महिन्यात लाय अध्यक्षपदी निवडले गेले होते. तसेच ऑक्टोबरमध्ये तैवानच्या राष्ट्रीय दिनाच्या वेळीही चीनने तैवान जवळ सशस्त्र युद्धसराव केला होता. अमेरिकेच्या संसदेच्या माजी सभापदी नॅन्सी पेलोसी यांनी गेल्या वर्षी तैवानला भेट दिली होती. तेंव्हाही चीनने असाच सशस्त्र सराव केला होता. चीनच्या युद्धनौकांच्या वाढत्या हालचाली बघता तैवानच्या लष्कराने आपत्कालिन प्रतिसादाची तयारी केली आहे.





