चीनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता

मुंबई – लडाख सीमेवरील भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच आता चीनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता वर्तविण्या येत आहे. हा सायबर हल्ला करण्यासाठी चीनी हॅकर्स एक ईमेलचा वापर करत असून त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरमार्फत करण्यात येत आहे.
सध्या भारत-चीन सीमेवरील वाद पाहता चायनीज हॅकर्स आता भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता. यासाठी [email protected] किंवा https://t.co/dps2ECSM1c अश्या खोट्या सरकारी इमेलवरून मेल पाठवल्याचे भासवू शकतात. त्यापासून सावधानता बाळगावी- @MahaCyber1 चे आवाहन pic.twitter.com/gjKZ4K5mFl
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 23, 2020
चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लॅन केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स [email protected] या ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हल्लयामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. तुम्हाला आकर्षित करणारा किंवा आर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला इमेल पाठवला जाईल.जसे की फ्री कोविड टेस्ट, फ्री कोविड-१९ किट अशा इ-मेलमध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाऊनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल [email protected] / ncov2019.gov.in अशा प्रकारच्या खोट्या सरकारी इमेल वरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते. मात्र अशा कोणत्याही प्रकारचे इ-मेल ओपन करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलकडून करण्यात आले आहे.
तसेच, [email protected] किंवा ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर कोणताही ईमेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करु नये किंवा त्यांना कोणताही रिप्लाय देऊ नये. सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईलसाठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत अँन्टी व्हायरस वापर करा , अशी सूचना महाराष्ट्र सायबर सेलकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर सेलकडून अशा प्रकारच्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे





