चीनचे पुन्हा एकदा भाई भाई; चीनच्या विशेष दूतांचा सहकार्य वाढवण्याचा निरोप
Updated On:

नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यातील प्रत्यक्ष ताबा रेषेवरून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरू असताना चीनने पुन्हा एकदा “हिंदी चीनी भाई भाई’चा नारा दिला आहे. भारत आणि चीनमध्ये सहकार्य वाढवण्याची अपेक्षा व्यक्त करत चीनच्या विशेष दुताने दोन्ही देशांनी शत्रूत्वाच्या भावने ऐवजी सहकार्याच्या भावनेवर जोर देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
चीन आणि भारतात मित्रत्वाच्या नात्याला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. या काळात बहुतांश वेळ आपले मैत्री वृधिंदगत राहिली. भारत आणि चीनसाठी विकास हेच साध्य करण्याचे ध्येय राहिले आहे. दीर्घकाळ आपले सामरिक संबंधही सहकार्याचे राहिले आहेत, असे चीनचे भारतातील राजदूत एच. ई सून विंगडोंग यांनी म्हटले आहेत. सध्याच्या द्विपक्षीय संबंधांबाबत ते बोलत होते.





