China Military Base । पूर्व लडाखमध्ये यश न मिळाल्यानंतर चीनची नजर आता पीओकेवर आहे. चीन कझाकस्तानमध्ये १३ हजार फूट उंचीवर लष्करी तळ बांधत असल्याचे सॅटेलाइट इमेजमधून समोर आले आहे. हे ठिकाण PoK च्या अगदी जवळ आहे. चीनला या भागात गुप्त लष्करी तळ बांधून तेथे तोफखाना जमा करायचा आहे. सध्या चीनने प्रसारमाध्यमांमधील अशा बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत आणि त्यांना निराधार म्हटले आहे. चीनची नेहमीच विस्तारवादी मानसिकता राहिली आहे. चीन नेहमीच आपल्या शेजारी देशांची भूमी काबीज करण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळी दावा केला जात आहे की चीन पीओकेला लागून असलेल्या कझाकिस्तानमध्ये लष्करी तळ बांधत आहे आणि हे काम अनेक दशकांपासून सुरू आहे. China Military Base । ‘द टेलिग्राफ’ने दिलेल्या वृत्तात झाला हा खुलासा ‘ज्यामध्ये उपग्रह चित्रांचा हवाला देत चीन कझाकिस्तानमध्ये जवळपास एक दशकापासून लष्करी तळ बांधत असल्याचे सांगण्यात आले आहे. ते 13 हजार फूट उंचीवर आहे. सोव्हिएत युनियन आणि रशियापासून वेगळे होऊन कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला आहे.’ China Military Base । चीनने मीडिया रिपोर्ट्सला फेटाळून लावले… अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येताच चीनने प्रतिक्रिया दिली. चिनी दूतावासाने म्हटले आहे की, कझाकस्तानमधील चिनी लष्करी तळाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि निराधार आहे. हा मुद्दा चीन-कझाकिस्तानच्या अजेंड्यातही समाविष्ट नाही. मॅक्सर टेक्नॉलॉजीजने सॅटेलाइटवरून घेतलेले काही फोटो शेअर केले आहेत, त्याबाबत चीन एक गुप्त लष्करी तळ बनवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. लष्करी तळाच्या भिंती आणि प्रवेशाचे रस्ते चित्रांमध्ये दिसत आहेत. China Military Base । काउंटर टेरर बेस धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा या लष्करी तळावर दोन्ही देशांनी टेहळणी टॉवर बसवले आहेत, असा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी लष्करी तळ बांधण्यात आला आहे ते ठिकाण सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असून ते अफगाण सीमेवर आहे. हे सुमारे 4 हजार मीटर उंचीवर डोंगरावर बांधले गेले आहे. इकॉनॉमिक टाईम्समधील एका अहवालात म्हटले आहे की, दोन्ही देशांनी 2021 मध्ये ते तयार केले आहे आणि त्याला काउंटर टेरर बेस असे नाव देण्यात आले आहे. या लष्करी तळाच्या माध्यमातून चीन मध्य आशियात आपली पकड मजबूत करत आहे.