या वर्षात चीन करणार 50 अवकाश मोहिमा

बीजिंग – या वर्षभरात चीनने एकूण 50 अवकाश मोहिमा करण्याचे नियोजन केले आहे. आपले अंतराळ स्थानक बांधण्यासाठी 6 अंतराळ मोहिमांमध्ये मानवालाही सहभागी करून घेतले जाणार आहे. अंतराळ क्षेत्रामधील उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने चीनने आपल्या या वर्षाच्या योजनांची माहिती आज जाहीर केली. या 50 अवकाश मोहिमांमधून एकूण 140 अवकाश यान अवकाशात पाठवली जाणार आहेत. “चायना एरोस्पेस सायन्सेस ऍन्ड टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन’ ने ही माहिती दिली आहे.
चीनने स्वतःचे अंतराळ स्थानक बांधण्यास सुरुवात केली असून यावर्षाच्या अखेरीपर्यंत ते काम पूर्ण होईल, असे या संस्थेच्या प्रमुखांनी सांगितले. हे अंतराळ स्थानक बांधून पूर्ण जाल्यावर आपल्या स्वतःचे अंतराळ स्थानक असलेला चीन हा जगातील एकमेव देश ठरणार आहे. सध्या कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक रशियाच्या मालकीचे आहे. मात्र त्यामध्ये इतर अनेक देशांची बागीदारी आहे.





