‘चीनला डोनाल्ड ट्रम्पच हवे आहेत कारण…’; अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांचा दावा

वॉशिंग्टन – डोनाल्ड ट्रम्प हेच अमेरिकेचे अध्यक्ष व्हावेत अशी चीनची इच्छा असल्याचा दावा भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी केला आहे. आपल्या या दाव्याच्या पुष्टीसाठी त्यांनी चीनच्या एका पुस्तकाचाही आधार घेतला.
अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेत चीन विषयक बाबींच्या समितीचे एक वरिष्ठ सदस्य असलेले राजा कृष्णमूर्ती म्हणाले चीनच्या एका प्रमुख नेत्याने एक पुस्तक लिहिले असून त्याचे शिर्षक अमेरिका अगेन्स्ट अमेरिका असे आहे. आणि आपण अशाच प्रकारे विजयी होऊ असे चीनला वाटते. अमेरिकेला पराभूत करण्याचा एकमेव मार्ग आहे की आपणच स्वत:ला पराभूत करणे.
संसदेत चीनच्या अर्थव्यवस्थेचे अध्ययन करणे हे माझे काम आहे. माझे म्हणणे गांभीर्याने घ्या. चीनला डोनाल्ड ट्रम्पच हवे आहेत कारण ज्याचा कधीच शेवट होणार नाही असे व्यापार युध्द ट्रम्प सुरू करतील आणि अमेरिकी नागरिकांसाठी महागाई वाढेल. ट्रम्प अमेरिकेती कामगारांच्या प्रशिक्षणाच्या बाबींमध्येही कपात करतील. त्याच्याही पुढे जात ट्रम्प अमेरिकी नागरिकांनाच अमेरिकेच्या विरोधात उभे करतील आणि आपण आपापसात लढावे हेच चीनला पाहिजे आहे.
राजा कृष्णमूर्ती म्हणाले की आपल्याला हरवण्याचा हाच मार्ग आहे मात्र आपण असे करणार नाही. कमला हॅरिस यांनीही तेच म्हटले आहे की जेंव्हा आपण एकत्रितपणे लढतो तेंव्हा विजयी होतो. जेंव्हा एक देश म्हणून आपण एकत्र असू तेंव्हा आपला विजय होईल याची कमला हॅरिस यांना जाण आहे. एक टीम म्हणून आपल्याला एकत्र राहावे लागेल आणि हेच कारण आहे म्हणून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपल्याला कमला हॅरिस यांना विजयी करावे लागेल.





