उपराष्ट्रपतींच्या अरूणाचल दौऱ्याला चीनचा विरोध
Updated On:

बिजींग – उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांच्या अरूणाचल प्रदेशच्या दौऱ्याला चीनने आक्षेप घेतला आहे. अरूणाचल प्रदेशला आम्ही भारताचा भाग मानत नाही त्यामुळे कोणत्याही भारतीय नेत्याच्या तेथील दौऱ्याला आमचा विरोधत असेल असे चीनने म्हटले आहे.
नायडू यांनी तेथे 9 ऑक्टोबरला भेट दिली होती. राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनात ते सहभागी झाले होते. तथापि भारताने हा आक्षेप फेटाळून लावला आहे.
अरूणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून भारताचे नेते तेथे कधीही भेट देऊ शकतात. कोणताही नेता जसा देशाच्या अन्य भागात जाऊ शकतो तसाच तो अरूणाचलप्रदेशलाही जाऊ शकतो असे भारत सरकारने म्हटले आहे.
अरूणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग आहे, त्यामुळे तो आमचाच प्रदेश आहे असे चीनचे म्हणणे आहे.





