इराण-इस्रायल युद्धबंदीवर चीनची प्रतिक्रिया ; म्हणाले,’आता आमचा विश्वासघात केला तर…’

China on Iran-Israel ceasefire। इराण आणि इस्रायलमधील १२ दिवसांच्या युद्धानंतर झालेल्या युद्धबंदीबाबत आता जगभरातून प्रतिक्रिया तीव्र झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर चीनने ,”यावेळी युद्धबंदी प्रामाणिकपणे पाळली पाहिजे आणि कोणत्याही पक्षाने फसवणूक करू नये.” असा सर्व पक्षांना स्पष्टपणे इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांमधील चीनचे स्थायी प्रतिनिधी फू काँग यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्हाला आशा आहे की ही युद्धबंदी पूर्णपणे प्रभावी होईल आणि सर्व पक्ष बिनशर्त आणि पूर्ण प्रामाणिकपणे त्याचे पालन करतील. यावेळी दोन्ही देशांकडून कोणतीही फसवणूक होऊ नये.” असेही या निवेदनात म्हटले गेले आहे. China on Iran-Israel ceasefire।
चीनचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा युद्धबंदीच्या काही तासांतच इराण आणि इस्रायलने पुन्हा एकदा एकमेकांवर हल्ल्याचा आरोप केला आहे. इस्रायलने इस्रायलवर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे, तर इराणने हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. दरम्यान, इस्रायलकडून प्रत्युत्तरात्मक हल्ल्यांचे इशारे देखील आले आहेत, ज्यामुळे पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली होती China on Iran-Israel ceasefire।
मंगळवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की,”दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी करार झाला आहे.” ट्रम्प म्हणाले की,” इराण प्रथम युद्धबंदी लागू करेल आणि २४ तासांच्या आत दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा शांतता परत येईल. ट्रम्प यांनी दोन्ही देशांना भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले, “आता शांततेची वेळ आली आहे. हे युद्ध वर्षानुवर्षे चालू शकले असते आणि संपूर्ण मध्य पूर्व नष्ट होऊ शकले असते, परंतु ते घडले नाही आणि आताही कधीही होणार नाही. अभिनंदन जगा, शांततेची वेळ आली आहे!”
हेही वाचा
‘इराणचे युरेनियम साठे सुरक्षितच..’ ; पेंटागॉनचा गुप्त अहवाल लीक ; ट्रम्प म्हणाले,”हा ‘फेक’ अहवाल”





