ट्रम्प यांना जिनपिंग यांचे चोख उत्तर ; चीनने अमेरिकन वस्तूंवर वाढवला १२५% कर

China Increases Tariffs | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १४५ टक्के कर लादल्यानंतर चीननेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. चीनने अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क ८४ टक्क्यांवरून १२५ टक्के करण्याची घोषणा केली आहे. हा अतिरिक्त दर १२ एप्रिलपासून लागू होईल.
चीनच्या अर्थ मंत्रालयाने सांगितले की, १२ एप्रिलपासून चीनमधील अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क ८४ टक्क्यांवरून १२५ टक्क्यांपर्यंत वाढेल. चीनचा हा निर्णय ट्रम्प यांच्या आदेशानंतर आला आहे, ज्यामध्ये अमेरिकेने चिनी उत्पादनांवरील शुल्क १४५ टक्क्यांपर्यंत वाढवले.
यापूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १४५ टक्के कर लादल्यानंतर चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सडेतोड उत्तर देताना त्यांनी सांगितले की या व्यापार युद्धात कोणीही जिंकणार नाही. China Increases Tariffs |
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धावर पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की त्यांचा देश घाबरणार नाही. बीजिंगमध्ये स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्याशी बोलताना जिनपिंग म्हणाले की, हे व्यापार युद्ध कोणीही जिंकणार नाही. जगाविरुद्ध जाऊन तुम्ही फक्त स्वतःला वेगळे कराल.
ते म्हणाले की, ७० वर्षांत चीनने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर विकास केला आहे. आम्ही कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. अमेरिकेच्या या एकतर्फी दादागिरीविरुद्ध युरोपियन युनियनने एकत्र येण्याचे आवाहन जिनपिंग यांनी केले.
अमेरिकेसोबतच्या वाढत्या व्यापार युद्धादरम्यान चीन आणि युरोपियन युनियनमधील सहकार्य वाढवण्यावर शी जिनपिंग यांनी भर दिला. ते म्हणाले की, चीन आणि युरोपने त्यांच्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत आणि या एकतर्फी गुंडगिरीला संयुक्तपणे प्रत्युत्तर दिले पाहिजे. China Increases Tariffs |





