चिंबळी: विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या संचालकपदी आप्पासाहेब बटवाल यांची बिनविरोध निवड

चिंबळी – चिंबळी (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या संचालक पदी आप्पासाहेब बटवाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेचे सचिव निलेश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली.
चिंबळी (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या इतर मागास वर्ग एका रिक्त जागेसाठी खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद राहुत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. संचालक पदासाठी आप्पासाहेब एकनाथ बटवाल यांचा सर्वानुमते एकच अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष जीवन जैद, उपाध्यक्ष प्रविण चव्हाण, संचालक विलास कातोरे, कुंडलिक बनकर, ज्ञानेश्वर जैद, मारुती पाटारे, हिरामण बहिरट, सत्यवान जैद, अमृता जाधव कातोरे, सुमन बनकर, दिपक बटवाल आदी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित संचालक आप्पासाहेब बटवाल यांचा सर्वानुमते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व संचालक व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.





