मुलांचा सोशल मीडियाचा वाढता वापर ; आरोग्याच्या विविध समस्यांना निमंत्रण

Children use social media । आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक ऍक्टिव्हिटी म्हणजेच खाणे, झोपणे, व्यायाम या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ सोशल मीडियावर स्क्रोल करत आणि कमेंट लाईक करत बसणे, यातून मुलांच्या झोपेवर आणि प्रकृतीवर परिणाम होत असल्याचे दिसून आलेले आहे.
मुलांपेक्षा मुली या सोशल मीडियाचा अधिक वापर करत असून त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते असे संशोधनात दिसून आलेले आहे. दुसरीकडे तुलनेत मुले जास्त संख्येने आळस आल्याचा, कंटाळा आल्याचा तसेच जांभई येण्याचा आणि एकूणच अस्वस्थ वाटल्याच्या वाटत असल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. त्यामुळेच मुलींच्या तुलनेत मुले शाळेतून जास्त संख्येने अनुपस्थित राहत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
यासंदर्भात संशोधकांच्या पथकाने अशी शिफारस केलेली आहे, की प्रत्येक व्यक्तीला आठ ते दहा तासांची शांत झोप मिळणे आवश्यक असते. या पथकात युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकीमधील संशोधकही सहभागी होते. त्यांनी मुलांसाठी त्यानियमित व्यायाम आणि पालकांबरोबर विश्वासार्ह नाते महत्त्वाचे असते, असे म्हटले आहे. विश्वासार्ह नात्यांमध्ये मुलाला पालकांसोबत त्याच्या मनातील सर्व चिंता काळजी मनावरील ताण-तणाव याबाबत मोकळेपणाने बोलता येईल अशी परिस्थिती असावी म्हणजेच पालक त्याच्या पाठीशी उभे राहतील असा त्याला विश्वास वाटायला हवा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या संशोधनाचे निष्कर्ष अर्काईव्हज् ऑफ डिसीज इन चाइल्डहूड या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.
जगभर अनेक अल्पवयीन मुलांना सोशल मीडियाद्वारे कॉल करून छळले जाते, त्यांचा पाठलाग करून धमकावणे आणि फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडतात. यामुळे या मुलांच्या मानसिक आरोग्य समस्या आणि मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. एखाद्या किशोरवयीन मुलास कोणत्याही प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीचा सामना करावा लागल्यास, त्याचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, तसेच एखाद्याने निगेटिव्ह कमेंट केली तर त्या धक्क्यामुळे एखाद्या मुलाचा स्वाभिमान आणि आत्मविश्वास डळमळू शकतो.सोशल मीडियाचा अति वापरामुळे आणि चिंता, नैराश्य, झोपेचे विकार, एडीएचडी, पॅरानोईया, भ्रम, आत्महत्येचे विचार आणि स्वत:ला हानी पोहोचविणे आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात.





