Pune : बाहुल्यांचा खेळ अन् चित्रकलेतून बालदिनाचा आनंद; १२० मुलांचा उत्स्फूर्त सहभाग!
Pune : आयडेंटिटी फाऊंडेशनच्या वतीने पुण्यातील कल्याणी, रेणुका आणि देवकर वस्तीतील १२० मुलांसाठी बालदिनानिमित्त बाहुल्यांचा खेळ, चित्रकला आणि शुभेच्छापत्रे तयार करण्याचे उपक्रम आयोजित करण्यात आले.

Pune : बालदिनानिमित्त आयडेंटिटी फाऊंडेशनच्या वतीने कल्याणी, रेणुका आणि देवकर वस्तीतील सुमारे १२० मुलांसाठी विविध आनंददायी आणि सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासोबतच त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात ‘शूरवीर ससा’ या गोष्टीच्या बाहुल्यांच्या खेळाने झाली. मनोरंजनातून मुलांना धैर्य, आत्मविश्वास आणि प्रसंगावधानाचा संदेश देण्यात आला. त्यानंतर मुलांनी स्वतःच्या कल्पकतेने रंगीबेरंगी शुभेच्छापत्रे तयार केली. चित्रकलेच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना फुगे आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संगीता शिंदे, योगिता पगारे आणि प्रमिला धोत्रे यांनी आयोजनात विशेष सहभाग घेतला.





