खुर्ची वाचवण्याच्या कसरतीमुळे मुख्यंत्र्यांना शेतकऱ्यांचा विसर

देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप
नागरपूर : हिवाळी अधिवेशनाचा प्रत्येक दिवस हा सरकार आणि विरोधी पक्षाच्या शाब्दिक युद्धात जात असल्याचे दिसत आहे. त्यातच विरोधी पक्षाने शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीवरून सरकारवर हल्लाबोल केला. त्यातच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्याची कवायत करत आहेत. दोन्ही सहकारी पक्षांना खुश करण्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप केला आहे. दोरीवरच्या कसरतीमुळे मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या तोडांला पानं पुसली आहेत. शेतकऱ्यांना 25 हजारांच्या मदतीचे काय झाले? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, अभिभाषणा दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देखील उत्तरे दिली नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी देखील ते काहीच बोलले नाही. त्यामुळे या शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार करत आम्ही सभात्याग केला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री शिवजी पार्कमधील सभेत भाषण करत असल्यासारखे बोलत होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण काळ्या दिवसासारखे होते, अशी टीका फडणवीस यांनी केली आहेत. तसंच, हे सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे सरकार आहे. शेतकरी विरोधी सरकारचा आम्ही धिक्कार करतो, असे फडणवीस यांनी सांगितले.





