मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा, मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा; नेमकं काय करणार आहात? दरेकर

Updated On:

पुणे – मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा व सरकारमधले मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करणार आहात हे सांगा.  असा सवाल विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे त्याभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनुष्यहानी सुद्धा झाली आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश, व्यथा प्रसामध्यमांच्या माध्यमातून दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मी व देवेंद्र फडणवीस येत्या दोन दिवसांचा मराठवाडा व विदर्भचा दौरा करणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरेकर म्हणाले की, ऐवढे दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीची मदत राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आली ऩाही. मंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामे न करता मदत देण्याची मागणी केली त्यावर दोन दिवसांत मदत केली जाणार असल्याचे वड्डेटीवार यांनी सांगितले आहे.

मात्र मुख्यमंत्री म्हणतात पंचनामे करा व सरकारमधले मंत्री म्हणतात पंचनामे न करता मदत करा. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नेमकं काय करणार आहात हे सांगा. आमची मागणी आहे की तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा त्याचबरोबर पंचनामे करायचे तेव्हा करा पण आता तात्कालीक मदत शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता आहे. कारण वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही. असे दरेकर यांनी सुनावले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

2026-10-07 19:06:35

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा

2026-10-07 17:37:34

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा