अकोले – मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रदेश संपर्क प्रमुख संभाजीराजे दहातोंडे यांनी शिवप्रतिमा भेट देऊन सत्कार केला.
अकोले येथे महाजनादेश यात्रेनिमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आले असता, दहातोंडे, मानसी वाडेकर, सिद्धी धुमाळ, अक्षता धुमाळ, प्रगती वैद्य, मनीषा भोर, हर्षदा वाकचौरे, स्वराज गवांदे, प्रथमेश सहाणे, अभिषेक वाकचौरे, युवक व युवती यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी पालकमंत्री राम शिंदे, आमदार वैभवराव पिचड, जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राज गवांदे, युवक जिल्हाध्यक्ष ओम काळे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे, युवक अध्यक्ष अक्षय अभाळे, शिक्षक अध्यक्ष किशोर धुमाळ, सुशांत वाकचौरे, अशोक आवारी, ईश्वर वाकचौरे उपस्थित होते.