मुंबई : गाय आई आहे, तर मुलगा कुठे आहे? असा प्रश्न विचारण्यात येत होता. तीचा मुलगा आता दिसतोय. तुम्हाला गायीचा मुलगा बघायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना पहा. हा गायीचा मुलगा आहे. सीएम म्हणजे मुख्यमंत्री नसून कॉमन मॅन असल्याचे एकनाथ शिंदे म्हणतात. मात्र, सीएम म्हणजे कॉमन मॅन नव्हे तर ‘काउज मॅन’असल्याची स्तुतीसुमने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्र्यांवर उधळली आहेत. मुख्यमंत्री शिंदे भाईंदरमध्ये ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांच्या भागवत सत्संग आणि सनातन संमेलनात सहभागी झाले होते. या आधी ते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. तर आता त्यांनी शिंदेंचे कौतुक केले आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगली आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, “प्रत्येकजण आपली कमाई खात आहे.” गायही आपले जीवन जगत आहे. आईची अपेक्षा असते की तिच्या मुलांनी किमान तिला आई म्हणून हाक मारावी. मात्र, त्याला 78 वर्षे लागली. एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीने मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे गायीला माता म्हणून संबोधले ही आनंदाची बाब आहे. ही काही छोटी बाब नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद पुढे म्हणाले की, “आई ज्या गोष्टीसाठी तळमळत होती.” ते काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. एकनाथ शिंदे यांनी दाखवलेली हिंमत गेल्या 78 वर्षांत अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दाखवता आली नसल्याचेही ते म्हणाले.’