Assembly Elections 2024: हरियाणा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर; जाणून घ्या मतदान, निकालाची तारीख

Haryana Assembly Elections 2024: हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, हरियाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. 2.1 कोटी मतदार आहेत. 20 हजारांहून अधिक मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. सर्वसाधारणसाठी 73 जागा आणि अनुसूचित जातीसाठी 17 जागा असतील.
त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हरियाणातील मतदारांची यादी 27 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल. यावेळी त्यांनी हरियाणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामध्ये 1 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
हरियाणामध्ये एका टप्प्यात निवडणुक –
हरियाणामध्ये फक्त एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हरियाणात 12 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. यानंतर 13 सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून 16 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तसेच निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हरियाणात एकूण 2.1 कोटी मतदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने हरियाणामध्ये विजय मिळवला होता. येथे गेल्या निवडणुकीत भाजपला 40 तर काँग्रेसला 31 जागा मिळाल्या होत्या.
जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुकांच्या तारखांची घोषणा –
याआधी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील 25 सप्टेंबरला, तर तिसऱ्या टप्प्याची मतदान 1 ऑक्टोबरला होणार आहे.
4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. तर हरियाणाबद्दल बोलायचे झाले तर येथील सर्व जागांवर एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 4 ऑक्टोबरला येथेही निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.





