Bangladesh News : बांगलादेशात नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती

Bangladesh News – बांगलादेशात नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. एएमएण नासिर उद्दीन यांना मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आज शपथ देण्यात आली. त्यांच्याबरोबर अन्य चार निवडणूक आयुक्तांना देखील शपथ देण्यात आली.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळातील निवडणूक आयुक्तांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याच्या तीन महिन्यांनंतर या नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या दालनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभात सरन्यायाधीश सईद रफात अहमद यांनी या निवडणूक आयुक्तांना पदाची शपथ दिली.
नवीन निवडणूक आयुक्तांच्या निवडीची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू होती. आज नयुक्त करण्यात आलेले मुख्य निवडणूक आयुक्त आणि आयोगाचे अन्य सदस्य हे सर्वजण माजी प्रशासकीय, लष्करी अधिकारी आणि कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीश आहेत.
अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी २१ नोव्हेंबर रोजी नवीन आयोगाची नियुक्ती केली होती. देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्यासाठी युनुस सरकारवर दबाव वाढत आहे.
मात्र निवडणूक आयोगच अस्तित्वात नसल्यामुळे सरकारवर नवीन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी देखील दबाव येऊ लागला होता. सरकार निवडणूक सुधारणांबाबत निर्णय घेताच निवडणुकीचे नियोजन करेल, असे युनूस यांनी १७ नोव्हेंबर रोजी सांगितले होते.





