छोटा राजनला आठ वर्षांचा कारावास

हत्येचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात शिक्षा

मुंबई – मुंबईतील विशेष न्यायालयाने हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन याच्यासह सहा जणांना दोषी ठरवले असून या प्रकरणी राजनला आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

गुन्हेगारी षडयंत्र रचणे, हत्या, हत्येचा प्रयत्न व 2012 मध्ये हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवले गेले आहे. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने 1332 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. हॉटेल व्यावसायिक बी आर शेट्टी यांच्यावर 2012 मध्ये गोळीबार करण्यात आला होता. दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या व हल्लेखोर फरार झाले होते. तर शेट्टी यांच्या खांद्याला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र तरीही त्यांनी जवळील पोलीस ठाणे गाठले होते व त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जानेवारी 2013 मध्ये मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात छोटा राजनच्या सुचनेवरूनच शेट्टींना गोळी मारण्यात आल्याचे म्हटले होते. छोटा राजन यास 2015 मध्ये बाली येथून अटक करून भारतात आणले गेले आहे. तेव्हापासून तो दिल्लीतील तिहार तुरूंगात आहे. त्याला मागील वर्षीच पत्रकार जे डे हत्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×