विधानसभा निवडणुका, ‘छावा’ सिनेमा; राज ठाकरेंच्या भाषणांतील महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात भाषणादरम्यान विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर महाराष्ट्रात निकालानंतर सन्नाटा पसरला. यामुळे लोकांमध्ये संभ्रम होता. असा निर्णय कसा आला. माझ्याकडे आरएसएसशी संबंधित एक व्यक्ती आलेली, मला दिसलं त्यांना हे पटलेलं नाही. ते छान वाक्य बोलले, मला म्हणाले इतना सन्नाटा क्यू हैं भाई, कोई तो जीता होगा” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.
याशिवाय त्यांनी विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटावर देखील भाष्य केले आहे. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कामाला सुरुवात करण्याचे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. यावेळी राज ठाकरेंनी नेमके कोणत्या कोणत्या विषयांवर भाष्य केले ते पाहूयात.
राज ठाकरेंच्या भाषणातील काही मुद्दे
– निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी पहिल्यांदाच बघितलं की सन्नाटा पसरलाय. लोकांमध्येच संभ्रम होता, महाराष्ट्रात सन्नाटा पसरला हे कसलं द्योतक आहे. काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. राजू पाटील यांचं एक गाव आहे, पाटलांच गाव आहे, तिथे त्यांनाच मतदान होतं. 1400 लोकं त्या गावात राहतात. त्यांना किती मत मिळाली. अख्ख्या गावाच मतदान त्यांना होतं. त्या गावातून राजू पाटील यांना एकही मत मिळाल नाही. अख्ख्या गावातून एक मत नाही पडलं, जी 1400 मतं राजू पाटील यांना मिळायची, तिथे एक मत मिळत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. Raj Thackeray |
निकालावर निवडून आलेल्यांचाच विश्वास नाही
महाराष्ट्रातील निकालावर अनेक निवडून आलेल्यांचाच विश्वास नाही. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले, ही आठवी टर्म होती. सातवेळा जे 70 ते 80 हजार मताधिक्क्याने निवडून यायचे, या निवडणुकीला त्यांचा 10 हजार मतांनी पराभव होतो. उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून बोलतायत, मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतय जे निवडून आलेत, त्यांचे अनेकांचे फोन आले, असेही राज यांनी सांगितले. Raj Thackeray |
ईडीच्या नोटीस संदर्भातील किस्सा
माझ्यामागे ईडी लागली म्हणून माझा मोदींना पाठिंबा अशा गोष्टी पेरल्या गेल्या. आम्ही आमचा नुकताच व्यवसाय सुरू केला, एके दिवशी पेपरमध्ये बातमी वाचली. बातमी अशी होती की एनटीसीच्या सगळ्या मिल्स काढा आणि कामगारांचे पगार देऊन टाका. एके दिवशी माझ्या सहकाऱ्याचा घाबरत घाबरत फोन आला, ज्या दिवशी मला ईडीची नोटीस आली, त्यात कोहिनूरचा विषय होता, असा किस्सा राज ठाकरेंनी ईडीच्या नोटीस संदर्भात सांगितला.
मतदान कुठेतरी गायब झालं
भाजपला 2014 मध्ये 121, 2019 मध्ये 105 जागा, पण यंदाच्या निवडणुकीत अजित पवारांना 42 जागा, कोणाचा विश्वास बसेल का, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. शरद पवारांना 10 जागा मिळतात, हे न समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे. लोकसभेला सर्वाधिक खासदार काँग्रेसचे, पण विधानसभेला काँग्रेसचे केवळ 15 आमदार आले. शरद पवारांचे 8 खासदार, त्यांचे केवळ 10 आमदार आणि अजित पवारांचे 42 आमदार?, केवळ 4 महिन्यांत इतका बदल?’ म्हणजेच लोकांनी आपल्याला मतदान केलं पण आपल्यापर्यंत आलं नाही. झालेलं मतदान कुठेतरी गायब झालं, असं असेल तर निवडणूक न लढलेलंच बरं, अशा शब्दात निकालावर राज ठाकरेंनी भाष्य केलं.
– जे तुम्हाला पक्षानं सांगितलं ते तुम्ही सतत लोकांपुढे मांडा. आतापर्यंत आपण काय काय केलं, कोणकोणती आंदोलन केली हे लोकांना कळवा. चार प्रश्न विचारल्यावर भांबावून जाणे हे बरं नव्हे. हा जाणीवपूर्व केलेला प्रचार असतो, हा जाणीवपूर्व केलेला प्रसार असतो. अनेक पत्रकार अनेक पक्षांच्या दावणीवर बांधले गेले आहेत, अनेक पत्रकार चांगलेही आहेत. भूमिका बदलणं कशाला म्हणतात हे कळतं का?, असे म्हणत राज ठाकरेंनी काही उदाहरणेही दिली.
– आधी राजकारण चांगलं होतं, कोणी कोणाचा वैरी नव्हता. पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबरशिवाय मनपा निवडणूक होतच नाही. नगरसेवकांची ओझी कोण उचलेल, अशी भूमिका दिसते. सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलेली तारीख आणखी पुढे ढकलतील. जरा सांभाळून राहा, पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत शिस्त पाळायची आहे.
– लहानपणापासून अनेक पराभव आणि विजय पाहिले. पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही. खचलेल्या पिचलेल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाही. माझ्याबरोबर राहायचं असेल तर ठाम राहा. जे महाराष्ट्रासाठी करायचं, मराठी माणसासाठी करायचं आहे, हिंदुंसाठी करायचं ते करणारच आहोत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
– कुंभमध्ये किती लोक गेली अजून आकडा येत नाही, असे म्हणत कुंभमेळ्यातील गर्दी आणि चेंगराचेंगरीतील मृतांबाबत राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले.
राजकीय भेटींवरील चर्चांवर भाष्य
अनेकांना वाटतं राज ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना भेटलं नाही पाहिजे, भेटलं नाही पाहिजे? समोरच्याने सांगितले. चहा प्यायला ये तर काय सांगू घरीच पी. एकदा चंद्रकांत पाटील मला भेटायला आले, माझ्याशी चहा घेतला आणि बाहेर पडले, चंद्रकांत पाटलांनी खुणा केल्या, असे म्हणत राजकीय भेटींवरील चर्चांवरही राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केले.
– महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसानं छावा पाहावा. शिवछत्रपती आपली प्रेरणा, संभाजीराजेंचं बलिदान आहे. मी ट्रेलर वगैरे बघितला नव्हता, अमेय खोपकरांनी येऊन सांगितलं. लेझिम हा महाराष्ट्रचा पारंपारिक खेळ आहे, संभाजीराजेंनी कधीतरी हातात लेझिम घेतलीच असेल, इतिहासात नोंद नसावी. हल्ली आपल्याकडे सगळे इतिहासतज्ज्ञ आहेत, असे म्हणत राज ठाकरेंनी छावा सिनेमावरील वादावरही अप्रत्यक्षपणे टोला लगावला.





