गंज अन् चुकीच्या वेल्डिंगमुळे छत्रपतींचा पुतळा कोसळला ; चौकशी समितीचा अहवाल सादर

Chhatrapati Shivaji Maharaj statue । सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला. या दुर्घटनेप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने आपला 16 पानी अहवाल सरकारकडे सादर केला आहे. या अहवालात गंज, कमकुवत फ्रेम आणि चुकीच्या वेल्डिंगमुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना, त्याची डिझाईन योग्य पद्धतीने तयार केली नसल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे.
भारतीय नौदलाचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले कमोडोर पवन धिंग्रांच्या अध्यक्षतेखाली, पाच सदस्य समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटीचे प्रा. जांगिड, प्रा. परिदा यांचा समावेश होता. दरम्यान हा अहवाल आल्यानंतर, राज्य सरकार दोषींवर नक्की कारवाई करेल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
वेल्डिंगमधे अनेक ठिकाणी चुका Chhatrapati Shivaji Maharaj statue ।
दरम्यान, मालवण छत्रपती शिवाजी महाराज दुर्घटनाप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही, हे मुख्य कारण यामध्ये समोर आले आहे. तसेच देखभाल योग्य पद्धतीने झाल्यानेच पुतळ्याला काही ठिकाणी गंज चढला होता, असे म्हटले आहे. यामध्ये प्रामुख्याने पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला होता, चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग या पुतळ्याचा करण्यात आलं होतं.
महाराजांचा पुतळा का कोसळला? Chhatrapati Shivaji Maharaj statue ।
शिवाजी महाराजांचा ज्याप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करण्यात आला होता. त्याची डिझाईन योग्य पद्धतीने तयार करण्यात आली नसल्याचं अहवालात तज्ज्ञांनी म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव यांच्याकडे हा अहवाल देण्यात आला असून यातील प्रमुख कारण आता समोर येत आहे. पुतळा पडण्याची अनेक कारण या तज्ञ मंडळींनी नमूद केली आहेत मात्र त्यातील प्रामुख्याने काही कारणे समोर आली आहेत.
चौकशी समितीच्या अहवालातील सूचनांनुसार दोषींवर कारवाई होणार : उदय सामंत
उदय सामंतानी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची देखभाल योग्य पद्धतीनं केली नाही त्यामुळे पुतळ्याला आतून गंज चढला होता. तसेच डिझाईनमधे अनेक चुका होत्या. वेल्डिंगमध्ये अनेक ठिकाणी चुका होत्या. चौकशी समितीच्या अहवालातील सूचनांनुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल.





