Satara: छत्रपती संभाजीनगरचा कायापालट होईल; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
Satara मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. तसेच कामांच्या सद्यःस्थितीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, माजी खासदार भागवत कराड तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Satara: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्वच जिल्ह्यातील विकासकामांना गती दिली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध प्रकल्पांची कामे सुरु आहेत. सर्व कामे दर्जेदार करून वेळेत पूर्ण केली जातील. राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरचा विकासात्मक कायापालट होईल, असा विश्वास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. तसेच कामांच्या सद्यःस्थितीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, माजी खासदार भागवत कराड तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.डॉ. हेडगेवार हॉस्पिटलजवळ उभारण्यात येत असलेली सारथी इमारत, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या फेज २ अंतर्गत सुरु असलेली बांधकामे, नेहरूनगर येथील उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसाठीची निवासी इमारत, नगर नाका ते पडेगाव सहापदरी रस्ता तसेच वाळूज- पंढरपूर- कॅम्ब्रिज- शेंद्रा एम. आय. डी. सी. या प्रस्तावित उन्नत रस्त्याच्या प्रकल्पाची पाहणा ना. शिवेंद्रसिंहराजेंनी केली. या पाहणीदरम्यान संबंधित प्रकल्पांची सद्यस्थिती, बांधकामाचा दर्जा, कामांची गुणवत्ता आणि उर्वरित कामांच्या प्रगतीची माहिती त्यांनी घेतली. सर्व कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या.
डॉ. हेडगेवार हॉस्पिटलजवळ उभारण्यात येत असलेल्या सारथी इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. या प्रकल्पांतर्गत प्रशासकीय इमारत, मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह आणि अभ्यासिका अशा चार इमारती उभारण्यात येत आहेत. मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये प्रत्येकी ५२८ विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. बांधकामाचा दर्जा राखून उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सारथी इमारतीचे उर्वरित बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या फेज २, नेहरूनगर येथील न्यायमूर्तींच्या निवासी इमारतीची पाहणी, नगर नाका ते पडेगाव सहापदरी रस्त्याच्या बांधकामाची पाहणी करुन रस्त्याची गुणवत्ता, डांबरीकरण, ड्रेनेज व्यवस्था आणि कामाचा वेग यांचा आढावा त्यांनी घेतला. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासोबतच निर्धारित वेळेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.





