Ambadas Danve Receives Death Threat : उद्धव ठाकरेंचे शिलेदार आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना धमकीचे फोन आले आहेत. या प्रकरणी अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल क्रांती चौक पोलीस ठाण्यात अदखलपात्र (NC) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आयुक्तांना दिलेल्या पत्रात दानवे यांनी ज्या क्रमांकावरून फोन आला, तो नंबरही दिला. तसेच ‘ठोकून काढू, कापून टाकू’ अशा धमक्या दिल्याचे देखील तक्रारीत सांगण्यात आले आहे. Chhatrapati Sambhajinagar अंबादास दानवे यांना ११ मार्च, १२ मार्च, १३ मार्च, १४ मार्च असे चार दिवस लागोपाठ धमकीचे फोन आले. तर १५ मार्च रोजी देखील रात्री १ वाजून ५४ मिनिटांनी पुन्हा फोन आला. ज्यामध्ये तुला कापून टाकू, ठोकून टाकू अशी थेट धमकी देण्यात आली. Chhatrapati Sambhajinagar Dry Fruits Benefits: कोणते ड्रायफ्रूट खावे? बदाम, अक्रोड ते अंजीर… शरीरासाठी कोणते कशासाठी उपयुक्त ते जाणून घ्या वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे दानवे यांनी अखेर पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून कसून तपास सुरू केला आहे. Ambadas Danve Receives Death Threat साधारण ३ ते ४ लोकांनी फोन करून धमक्या दिल्या. या घटनेमुळे माझ्या व कुटुंबियांच्या सुरक्षेस धोका संभवू शकतो. Chhatrapati Sambhajinagar या घटनेची रीतसर चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून केली आहे. अंबादास दानवे यांना धमक्यांचे फोन आल्यानंतर आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. Chhatrapati Sambhajinagar हेही वाचा: Broccoli Benefits: संत्र्यासारखं व्हिटॅमिन-सी देणारी भाजी! ‘ही’ भाजी खाल्ल्याने वाढते रोगप्रतिकारशक्ती