Political News : राजकीय वर्तुळात खळबळ ! ठाकरेंच्या बड्या शिलेदाराला अटक; नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव परिसरात (Political News) एका साध्या ड्रेनेजलाइनच्या पाहणीने अचानक अत्यंत हिंसक आणि धक्कादायक वळण घेतले.

Political News : छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव परिसरात (Political News) एका साध्या ड्रेनेजलाइनच्या पाहणीने अचानक अत्यंत हिंसक आणि धक्कादायक वळण घेतले. शुक्रवारचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू असताना, पाहणीच्या मुद्द्यावरून नगरसेवक गणेश लोखंडे आणि स्थानिक नागरिकांमध्ये खटके उडाले. सुरुवातीला सामान्य वाटणारा हा शाब्दिक वाद क्षणात पेटला आणि त्याचे रूपांतर थेट रक्तरंजित संघर्षात झाले.
पाहता पाहता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवण्यात आला. वाद इतका टोकाला (Political News) पोहोचला की परिसरात थेट धारदार हत्यारे उपसली गेली. चाकूने जीवघेणे वार करणे, रस्त्यावरील वाहने फोडणे आणि घरांची बेधडक नासधूस करणे अशा घटना घडल्याचे गंभीर आरोप दोन्ही गटांनी एकमेकांवर केले आहेत. या अचानक झालेल्या उद्रेकामुळे संपूर्ण पडेगाव परिसरात दहशतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल करत कठोर पावले उचलली आहेत. या हाणामारीप्रकरणी नगरसेवक गणेश लोखंडे आणि अर्जुन लोखंडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांचीही रवानगी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत (Political News) केली आहे. या हिंसक संघर्षामागे केवळ ड्रेनेजचाच वाद होता की आणखी काही जुने वैमनस्य, याचा सखोल तपास आता छावणी पोलिस करत आहेत.






