Chhatrapati Sambhajinagar News: एका बड्या महिला मंत्र्याच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; मोठा अनर्थ टळला
Chhatrapati Sambhajinagar News: हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात येताच, सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.
Updated On:

Chhatrapati Sambhajinagar News: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरवरून लातूरकडे प्रचारसभेसाठी हेलिकॉप्टरने जात होत्या.
मात्र उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पंकजा मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत.
या प्रचारसभेसाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात येताच, सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.
नियोजित सभांच्या वेळेत बदल
दरम्यान, हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील नियोजित सभांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असून, त्या थोड्याच वेळात लातूरकडे रवाना होतील, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे लातूरमधील नियोजित सभांची वेळ पुढे ढकलण्यात आली आहे.
हेही वाचा:






