छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला प्रतापगड
Updated On:

सातारा – “छत्रपती शिवाजी महाराज की जय’, “जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष तसेच लेझीम, ढोल-ताशा-हलगीचा निनाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृवावर शाहिरांच्या आवाजात घुमणारे पोवाड्यांनी भगवेमय वातावरणात मंगळवारी प्रतापगडावर शिवप्रतापदिनाचा अभूतपूर्व सोहळा रंगला. यावेळी तरुणांनी सादर केलेल्या मर्दानी खेळांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. उपस्थितांनी मर्दानी खेळाचे हे क्षण आपल्या नजरेत साठवून ठेवले.
- अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक भवानी मातेला महाअभिषेक घालून महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते.
- छत्रपती शिवरायांच्या पालखी मिरवणुकीच्या प्रारंभी पालखी नेताना अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते तसेच इतर प्रशासकीय अधिकारी.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पालखीतून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक.
- तोंडात रॉकेल घेऊन आगीच्या गोळ्यावर फुंकर मारुन थरारक पद्धतीने भडका
- :मैदानी खेळ सादर करताना जावळी येथील शालेय विद्यार्थी.
- मैदानी खेळाच्या प्रसंगी एका तरुणाच्या पोटावर ठेवलेले केळं तलवारीच्या सहाय्याने कापताना दुसरा तरुण.
- मिरवणूक प्रसंगी ढोल पथकाकडून सादर केली जाणारी प्रात्यक्षिके पाहण्यासाठी झालेली गर्दी.












