“…तर दंड वसूल केला जाईल ” भुजबळांचा लाडक्या बहिणींना इशारा ; तर उदय सामंत म्हणाले,”अशा लाडक्या बहिणी…”

Chhagan Bhujbal -Uday Samant । विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ ,महायुतीची वरदान ठरली होती. या योजनेमुळेच महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्यास मदत मिळाली. दरम्यान, या योजनेसाठी अर्ज केलेल्या सर्व महिलांना निकषांच्या आधारे पैसे देण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे. आता या सगळ्यात या योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार छगन भुजबळ यांनी अपात्र लाडक्या बहिणींना इशारा दिला आहे. “अपात्र महिलांनी स्वतःहून आपली नावं योजनेतून काढून टाकायला हवी” असे भुजबळांनी म्हटले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले आहे.
अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल. Chhagan Bhujbal -Uday Samant ।
छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना, “अपात्र महिलांनी योजनेतून आपलं नाव काढून घेण्यासाठी त्यांना आवाहन केलं पाहिजे. तसेच, सरकारने आतापर्यंत ज्या अपात्र महिलांना या योजनेचे पैसे दिले आहेत ते परत मागण्यात काही अर्थ नाही. सरकारनेही ते पैसे आता मागू नये. मात्र, लोकांना यापुढे सांगावं की नियमांत न बसणाऱ्या महिलांनी स्वतःहून या योजनेतून त्यांचं नाव काढून घ्यावं, अन्यथा त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल. याआधी आपण जे पैसे महिलांना दिले आहेत ते आपण लाडक्या बहिणींना अर्पण केलेत असं समजूया, ते परत मागू नयेत.”असे म्हटले आहे.
लाडक्या बहिणींमुळे आम्ही पुन्हा सत्तेत Chhagan Bhujbal -Uday Samant ।
दरम्यान, छगन भुजबळ यांच्या इशाऱ्यावर मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. उदय सामंत यांनी, “लाडक्या बहिणींमुळे आम्ही पुन्हा सत्तेत आलेलो आहोत. ज्यांच्यामुळे आम्हा सर्वांना पुन्हा एकदा सत्तेपर्यंत जाता आलं अशा लाडक्या बहिणी, राज्यातील ज्येष्ठ नागरिक व तरुणांमुळे आम्ही पुन्हा सत्तेत बसलो, त्यांच्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. त्या योजना कुठेही खंडित होणार नाहीत, बंद केल्या जाणार नाहीत”. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तर या अगोदर, सरसकट कोणत्याही अर्जाची छाननी होणार नाही, असं मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.





