Chhagan Bhujbal : मंत्रिपदाची शपथ घेताच छगन भुजबळ ‘अॅक्टिव्ह मोड’मध्ये, म्हणाले… शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज

Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यात, येवल्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि इतरांशीही बोलणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, हे पाहू. त्यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. त्यासाठी मी प्रयत्न करेन”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिली आहे.
नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले, शेवट चांगला असेल तर सगळं चांगलं अशी इंग्रजीत एक म्हण आहे. 1991 पासून मी विविध खाती सांभाळली आहेत. विविध विभागांचा कारभार मी पाहिलेला आहे. गृहमंत्रिपदापासून विविध जबाबदाऱ्या मी सांभाळल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री देतील ते खातं मला चालेल. सरकार जी जबाबदारी देईल, ती मी पार पाडेन. मी कोणत्याची खात्याची अपेक्षा केलेली नाही, असं छगन भुजबळ म्हणाले.
शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची गरज
तसेच पुढे बोलताना म्हणाले, नाशिक जिल्ह्यात, येवल्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्री आणि इतरांशीही बोलणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल, हे पाहू. त्यांना तातडीची मदत करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. त्यासाठी मी प्रयत्न करेन, असाही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
अखेर छगन भुजबळांची नाराजी दूर
दरम्यान, आज छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवनात राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यांच्यासह पन्नास मान्यवर उपस्थित होते. प्रचंड बहुमतानं सत्तेत आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या पहिल्या यादीत छगन भुजबळ यांचं नाव नव्हतं.
त्यामुळे भुजबळांनी वेळोवेळी नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर घडलेल्या बीड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. मुंडेंच्या खात्यावर भुजबळांची वर्णी लागेल अशी चर्चा होती. त्यानंतर आता पुन्हा छगन भुजबळांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली असून राज्याच्या मंत्रिमंडळात कमबॅक झालं आहे.





