छगन भुजबळांना मंत्रिपद नाही? राष्ट्रवादीकडून ‘या’ आमदारांना आले मंत्रिपदासाठी फोन

Maharashtra Cabinet Expansion | महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराचे काउंटडाउन आता सुरू झाले आहे. या शपथविधी समारंभासाठी अनेक आमदारांना फोनही गेले आहे. मात्र नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी जुन्या नेत्यांचा पत्ता कट करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भाजपकडून सुधीर मुनंगटीवार, रवींद्र चव्हाण यांना अजूनही फोन आलेला नाही.
तसेच शिंदे गटाचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांनाही फोन आलेले नाही. तर मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचं नाव अजूनही आलं नाही. त्यामुळे या नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. Maharashtra Cabinet Expansion |
अद्याप मंत्रीपदासाठी भुजबळांना फोन आलेला नाही. तसेच मंत्र्यांच्या यादीत दिलीप वळसे, धर्मराव अत्राम, अनिल पाटील यांनांही मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात 7 राष्ट्रवादी आमदारांपैकी फक्त नरहरी झिरवाळ यांना मंत्रीपदासाठी फोन आला आहे. त्यामुळे भुजबळ यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान नसल्याची चर्चा आहे. परंतु 2014 ते 2019 सोडून छगन भुजबळ अनेक वर्ष मंत्री राहिले आहेत. Maharashtra Cabinet Expansion |
राष्ट्रवादीकडून कोणाला आले मंत्रिपदासाठी फोन ?
आदिती तटकरे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, माणिकराव कोकाटे, दत्ता भरणे, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे.
33 वर्षांनंतर नागपूरमध्ये मंत्र्याचा शपथविधी पार पडणार
भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्रिपदे, शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह 12 मंत्रिपदे आली असल्याचे म्हंटले जात आहे. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 मंत्री आज शपथ घेणार आहे. आज सायंकाळी 4 वाजता हा शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारीही पूर्ण झाली आहे. 33 वर्षांनंतर नागपूरमध्ये मंत्र्याचा शपथविधी पार पडत आहे. यापूर्वी 1991 मध्ये नागपूर मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला होता.
हेही वाचा:
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का ; नगरसेवक रमेश पहेलवान पत्नीसह ‘आप’मध्ये सामील





