‘रस्त्यातील अडथळे दूर करावे लागतील’ ; छगन भुजबळांचा रोख नेमका कोणाकडे ?

CHHAGAN BHUJBAL । महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या खराब कामगिरीबाबत नेत्यांमध्ये राजकीय चर्चा सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील महायुतीच्या कामगिरीबाबत पुन्हा एकदा मत व्यक्त केलंय. राष्ट्रवादीच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी, “लोकसभा निवडणुकीत युतीला मोठा धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत यावर खूप विचार करण्याची गरज आहे” असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी, लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे, हे नाकारता येणार नाही. ‘रस्त्यातील अडथळे आता दूर करावे लागतील, मुंबई निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर मुंबईत सर्वत्र विकासाची कामे सुरू आहेत, मला वाटले मुंबईत सर्व जागा येतील, पण लोकसभा निवडणुकीत याठिकाणावरून किती उमेदवार निवडून आले? असा सवाल त्यांनी वेळी केला.
‘दलित, मुस्लिम,आदिवासी समाज आम्हाला का सोडून गेला?’ CHHAGAN BHUJBAL ।
अजित पवार गटाचे नेते पुढे म्हणाले, “दलित, मुस्लिम आणि आदिवासी समाज आम्हाला का सोडून गेला? याचा विचार व्हायला हवा. जेव्हा आपण या आजारावर उपाय शोधू तेव्हाच आपण यशस्वी होऊ. आम्ही 400 पार बद्दल बोललो पण लोकांना असे वाटले की 400 पेक्षा जास्त म्हणजे संविधान बदलण्यासाठी मोहीम चालवली जात आहे. पंतप्रधान मोदी एका मुलाखतीत 15 मिनिटे याबद्दल बोलले, परंतु, तोपर्यंत प्रचार संपला होता. संविधान बदलणे म्हणजे आरक्षण हे लोकांना समजले.” असेही त्यांनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? CHHAGAN BHUJBAL ।
दरम्यान, त्याअगोदर , अजित पवार गट राष्ट्रवादीचे आणखी एक नेते प्रफुल्ल पटेल यांनीही महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आपली प्रतिक्रिया दिली होती. प्रफुल्ल पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, निवडणुकीच्या काळात विरोधकांनी केलेल्या प्रचारामुळे आपण मागे राहिलो. संविधान बदलण्याबाबत गैरसमज निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. संविधान बदलण्याबाबत दलित समाजातच नव्हे तर आदिवासी समाजातही हे नैरेटिव निर्माण झाले. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी महायुतीने एकूण 17 जागा जिंकल्या.
हेही वाचा
अन्न, वस्त्र, गृहनिर्माण, शिक्षण आणि आरोग्याशी संबंधित महत्त्वाची मंत्रालये कोण सांभाळणार?





