छगन भुजबळांना पुन्हा झटका ! ‘या’ प्रकरणी न्यायालायने दिली तंबी

Chhagan Bhujbal । महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांनीनाराजी ओढवून घेतलेले अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झालीय. कारण त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिलाय. भुजबळांना कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने तंबी दिली आहे. पुढील सुनावणीला हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिलेत. सुनावणीला गैरहजर राहिल्यास वॉरंट बजावण्याचा इशाराही सत्र न्यायालयाकडून देण्यात आला आहे.
पुढील सुनावणीला हजर राहावे लागणार Chhagan Bhujbal ।
न्यायालयाने इशारा देताना सांगितले की, तुम्ही अनेकदा तारखांना गैरहजर राहिला आहात. पुढील सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावलं जाईल, असा तोंडी इशारा देत न्यायालयाने भुजबळ यांचा सुनावणी पुढे ढकलण्याचा अर्ज फेटाळून लावला. तसेच पुढील सुनावणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. या प्रकरणी आता 28 जून रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशांमुळे छगन भुजबळ यांना पुढील सुनावणीमध्ये न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
सुनावणी पुढे ढकलण्यासाठी भुजबळांकडून अर्ज
कलीनामधील राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्याच्या गैरव्यवहार प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. हे प्रकरण छगन भुजबळ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हाच्या कालखंडातील आहे.
राज्य मध्यवर्ती ग्रंथालय उभारणीच्या कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) भुजबळ यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या खटल्याची मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.
हेही वाचा
“…तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते” ; टी.राजा सिंह यांचे वादग्रस्त वक्तव्य





