Chhaava 2 Film : ‘छावा’चा सिक्वेल येणार? विकी कौशल पुन्हा झळकणार एका महत्त्वाच्या भूमिकेत
Chhaava 2 Film :

Chhaava 2 Film : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला मोठी पसंती मिळाली. लक्ष्मण उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा विकी कौशलच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित असणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
2025 मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरलेल्या ‘छावा’च्या ऐतिहासिक यशानंतर ही जोडी पुन्हा एकदा इतिहास घडवण्यासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.
एका वृत्तानुसार, ‘छावा’च्या पहिल्या भागात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांनी अनुभवल्यानंतर आता दुसऱ्या भागात संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनप्रवास मांडला जाणार आहे. Chhaava 2 Film
संभाजी महाराजांची भूमिका अजरामर केल्यानंतर आता विकी कौशल स्वतः शाहू महाराजांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी किंवा 2028 च्या सुरुवातीला सिनेमाचं शुटिंग सुरू होऊ शकतं.
मात्र, या नव्या बायोपिकबाबत विकी किंवा उतेकर यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. Chhaava 2 Film
दरम्यान, लक्ष्मण उतेकर ‘ईथा’ या सिनेमाच्या दिग्दर्शनात व्यस्त असून, यात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा पूर्ण केल्यानंतरच ते शाहू महाराजांच्या कथेला सुरुवात करणार आहे.
दुसरीकडे, विकी कौशल देखील सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या सिनेमाचं शूटिंग करत आहे. त्यानंतर तो भगवान परशुरामांवर आधारित ‘महावतार’ या मोठ्या प्रोजेक्टसाठी तयारी करणार आहेत. Chhaava 2 Film
हेही वाचा:






