चेतन तुपे यांनी मतदारसंघाचा विकास केला; प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले यांचे प्रतिपादन

मांजरी – मतदारसंघात मुख्य व अंतर्गत रस्ते, शिक्षण,आरोग्य, पाणीपुरवठा अशा मुलभूत सुविधा आमदार चेतन तुपे यांनी गेल्या काही वर्षांत निर्माण केल्या. जातीपाती विरहित सर्वसमावेशक समाजकारण व राजकारण करीत, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला. पुढेही मतदासंघांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन मांजरी येथील नागरिकांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुरेशआण्णा घुले यांनी केले.
मांजरी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मांजरी परिसरात पदयात्रा आणि बाईक रॅली काढण्यात आली. त्यावेळी घुले बोलत होते. यावेळी जि.प.चे माजी सदस्य दिलीप घुले, पुणे जिल्हा दुध उत्पादक संघाचे गोपाळ म्हस्के, शिवराज घुले, प्रशांत घुले, दिलीप टकले, रवींद्र गोगावले, अजित घुले, निलेश घुले, रोहिणी तुपे, पुरुषोत्तम धारवडकर, शैलेश म्हस्के, सुधीर घुले, अमर घुले, अक्षय तारू.
शिवाजी खलसे, राजेंद्र गारुडकर, समीर घुले,अमित घुले, सुमित घुले, प्रमोद कोद्रे, बबन जगताप, अभिजीत टकले, मंगेश मोरे, अनिल घुले, महादेव दंदी, सागर बत्ताले, बाळासाहेब घुले, भारती तुपे, मयूर खलसे, जितिन कांबळे, अनुप घुले, सुभाष घुले, सचिन घावटे, सुनील घुले, संदीप भागे, अभिजित डोगरे, प्रदीप पवार, अमित तुपे, बाबा मोरे, समीर तुपे, संजय घुले, अनिल गुंडाळे, समीर घुले, अमोल मोरे, सागर घुले, विशाल मस्के, राजू चपळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





