Chess Tournament : कविश, प्रथमेश, संदेश, अर्जुनला विजेतेपद…
Updated On:

पुणे – कुंटे चेस अकादमी आणि मिलेनियम नॅशनल स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या सहकार्याने आयोजित तिसऱ्या मिलेनियम नॅशनल स्कुल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत प्रथमेश शेरला, संदेश बजाज, कविश लिमये, अर्जुन कौलगुड यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
मिलेनियम स्कुल, कर्वेनगर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत १० वर्षाखालील गटात कविश लिमये याने विहान देशमुखचा पराभव करून ६.५ गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. ८ वर्षाखालील गटात अर्जुन कौलगुड याने शौर्य घेलानीचा पराभव करून ७ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.
रेटेड गटात प्रथमेश शेरला याने सुयोग वाघचा पराभव करून ६ गुणांसह विजेतेपद पटकावले. अनरेटेड गटात संदेश बजाजने सागर कोल्हेचा पराभव करून ७ गुणांसह अव्वल स्थान मिळवले.
टॅग्स:





