सिंगापुरकडे जाणाऱ्या विमानाचे चेन्नाईत इमर्जन्सी लॅंडिंग

चेन्नई: सिंगापुरकडे जाणाऱ्या एका खासगी विमानाचे आज चेन्नाई विमानतळावर इमर्जन्सि लॅंडिंग करावे लागले आहे. हे विमान तिरूचिरापल्लीकडून सिंगापुरकडे जात असताना वाटेतच विमानाच्या इंजिनात स्पार्किंग होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ते तातडीने चेन्नाई विमानतळाकडे वळवून तेथे उतरवण्यात आले. विमानात एकूण 170 प्रवासी होते. पण ते सुखरूप उतरल्याने त्यातील कोणालाहीं ईजा झाली नाही.

वैमानिकाने विमान इंजिनात स्पार्किंग होत असल्याचे नमूद केल्यामुळे चेन्नाई नियंत्रण कक्षाने त्यांना तातडीने उतरू देण्यास अनुमती दिली व तेथे अग्निशमन यंत्रणा तातडीने तैनात करण्यात आली. स्पार्किंग नेमके कशामुळे झाले याचे कारण समजू शकले नाही. तज्ज्ञांचे पथक तेथे कार्यरत करण्यात आले असून प्रवाशांना तात्पुरत्या निवासासाठी शेजारच्याच हॉटेलात हलवण्यात आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.