लॉस एंजलीस डॉजर्सकडे चेल्सीची मालकी
Updated On:

लंडन – युरोपमधील नावाजलेल्या चेल्सी फुटबॉल क्लबची मालकी आता अमेरिकेतील प्रसिद्ध लॉस एंजलीस डॉजर्सकडे आली आहे. इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत सर्वात बलाढ्य मानला जात असलेल्या चेल्सी क्लबची मालकी तीन अब्ज डॉलर रकमेला लॉस एंजेलिस डॉजर्सने प्राप्त केली आहे.
टॉड बोहली हे या कंपनीचे सहमालक असून युक्रेनवर युद्ध लादल्यामुळे रशियाच्या रोमन अब्रामोव्हिच यांना या क्लबची मालकी सोडावी लागली. फिफाक्लब विश्वचषक विजेत्या आणि 2021 सालातील चेल्सी क्लबची विक्री 2.5 अब्ज पौंड इतक्या प्रचंड रकमेला करण्यात आली आहे. जागतिक संघ विक्रीतील हा उच्चांक मानला जातो.
टॅग्स:





