Charlie Kirk shot Dead। ‘टर्निंग पॉइंट यूएसए’ या रूढीवादी युवा गटाचे सीईओ आणि सह-संस्थापक चार्ली कर्क यांची गोळीबार करत हत्या करण्यात आली आहे. अमेरिकेतील युटा व्हॅली विद्यापीठात एका वादविवाद कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. चार्ली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे खूप जवळचे सहकारी होते. ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. चार्लीच्या सन्मानार्थ ट्रम्प यांनी देशातील सर्व राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे आदेश दिले आहेत. टर्निंग पॉइंटने आयोजित केलेल्या वादविवादात बोलताना कर्कवर गोळीबार करण्यात आला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “कर्क यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच एक संशयित ताब्यात आहे, परंतु त्याची ओळख अद्याप उघड झालेली नाही” असे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाला आधीच होत विरोध Charlie Kirk shot Dead। काही लोकांनी कर्क यांच्या विद्यापीठात उपस्थितीचा निषेधही केला होता. विद्यापीठ प्रशासनाला त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करणाऱ्या ऑनलाइन याचिकेवर सुमारे १,००० स्वाक्षऱ्या होत्या. परंतु गेल्या आठवड्यात विद्यापीठाने स्पष्ट केले होते की हा कार्यक्रम रद्द केला जाणार नाही कारण हा पहिल्या दुरुस्तीअंतर्गत ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ आणि ‘संवाद’शी संबंधित विषय आहे. ट्रम्पकडून कर्क यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त Charlie Kirk shot Dead। चार्लीच्या मृत्यूची माहिती देताना ट्रम्प यांनी लिहिले की, ‘महान आणि खरोखरच महान, चार्ली कर्क आता या जगात नाहीत. अमेरिकेतील तरुणांना त्यांच्यापेक्षा चांगले कोणीही समजले नाही आणि चार्लीसारखे हृदय कोणाकडेही नव्हते. त्यांना सर्वांनी, विशेषतः मी, प्रेम आणि आदर दिला. आता ते आपल्यात नाहीत. मेलानिया आणि मी त्यांची प्रिय पत्नी एरिका आणि संपूर्ण कुटुंबाप्रती शोक व्यक्त करतो. चार्ली, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो!’