Charholi Crime – कर्जाच्या हप्त्यावरून झालेल्या वादातून तिघांनी एका व्यक्तीसह त्याच्या नातेवाईकाला मारहाण करून मिरची पावडर टाकल्याची घटना मंगळवारी (दि. ३) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सावता माळी मंदिराच्या जवळ, च-होली परिसरात घडली. बाबूराव निवृत्ती नरदुंडे, पूजा (पूर्ण नाव माहिती नाही) आणि सुनीता गवांडे अशी गुन्हा दाखल णलेल्या आरोपींची नावे आहेत. अभिजीत अशोक भालेराव (वय 35, रा. सावता माळी मंदिराजवळ, चिखली बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे) असे जखमीचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. ३) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजीत भालेराव हे चालक आहेत. त्यांनी घेतलेल्या टेम्पोच्या कर्जाचा हप्ता भरला नसल्याने त्यावरून आरोपींसोबत वाद झाला. या वादातून आरोपींनी शिवीगाळ करून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकाच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकली. त्यानंतर त्यांना डोक्यात मारहाण करून दुखापत केली. या प्रकरणाचा पुढील तपास चिखली पोलीस ठाणे करीत आहे.