त्यांचे दैवत बदलल्याने आश्‍चर्य वाटतेय : झावरे

पारनेर  – ज्यांचे पक्षासाठी काहीच काम नाही. त्यांच्या हातात नेतृत्व देऊन पक्ष काय साध्य करू इच्छितो, हे कळले नाही. तसेच ज्यांच्याकडे नेतृत्व दिले, त्यांनी दैवत बदलल्याने आश्‍चर्य वाटतेय. पक्षाने विश्वासात न घेता तालुक्‍यातील पक्ष नेतृत्वाबाबत वेगळा निर्णय घेतला. त्यामुळे मी नव्हे पक्षानेच मला फसविले, आहे अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केली आहे.

तालुक्‍यातील देवीभोयरे, ढवळपुरी, पुणेवाडी, वडगावदर्या या गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते, सभामंडपासह इतर 92 लाख खर्चाच्या विकासकामांचा प्रारंभ झावरे यांच्या हस्ते झाला. झावरे म्हणाले, पक्षात नव्याने दाखल झालेले युवा नेते मागील काही वर्षे बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहे, असे सांगत होते. त्यांचे दैवत अचानक बदलल्याने आश्‍चर्य वाटत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.