आरबीआयकडून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या वेळेत बदल

नवी दिल्ली : डिजिटल इंडियामुळे ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी ग्राहकांनी पंसती दशर्वली आहे. त्यातच आता आरबीआयने ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या वेळांमध्ये काही बदल केले आहेत. या बदलांचा ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचे दिसत आहे.
ऑनलाईन व्यवहारातील RTGS आणि NEFT च्या वेळांमध्ये हे बदल करण्यात आले आहे. यापूर्वी सकाळी 8 वाजता या व्यवहारासाठी सुरुवात होत, पण नव्या नियमानुसार सकाळी 7 वाजता हे व्यवहार सुरू होतील. या महिन्यातील 26 तारखेपासून या व्यवहाराची वेळ बदलली जाईल. सध्या ग्राहकांच्या आवक-जावक व्यवहारासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंतच ऑनलाईन व्यवहार करण्यात येतात. RTGS – आरटीजीएस ऑनलाईन व्यवहारामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 7.45 वाजेपर्यंत देणे आणि घेणे व्यवहार करता येत येतो. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी असलेल्या सुट्टीदिवशी ही ऑनलाईन व्यवहारप्रणालीही बंद असते. मोठी रक्कम पाठविण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कमीत कमी 2 लाख तर जास्तीत जास्त कितीही रक्कम पाठवता येते. NEFT – नुकतेच आरबीआयने या ऑनलाईन व्यवहारप्रणालीत 24 तासांसाठी व्यवहार घेणे-देणे करण्यात मुभा देण्यात आली आहे. गेल्या महिन्यातील डिसेंबर महिन्यापासून ही सुविधा सुरू झाली आहे. तर NEFT मध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत व्यवहार करता येतो. या व्यवहारांमध्ये 2 लाखांपर्यंत रुपये पाठवता येतात. दरम्यान, आता 26 ऑगस्टपासून 8 ऐवजी सकाळी 7 वाजल्यापासून ही सुविधा सुरू होत आहे.




