हडपसरमध्ये परिवर्तन निश्चित : हाके

मांजरी – सत्ताधारी व विरोधकांच्या फसव्या राजकारणाला आता जनता पूर्णपणे कंटाळली आहे. यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी परिवर्तन घडवणार असल्याचा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्याम बापू हाके यांनी व्यक्त केला.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्याम बापू हाके यांच्या प्रचारार्थ मांजरी बुद्रुक व ससाणेनगर भागातून पदयात्रा काढण्यात आली, त्यावेळी हाके बोलत होते.
यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष पितांबर धिवार, पराग बरकडे, संदीप शेंडगे, गणेश गोरे, किशोर गोरे, सूरज बेरे, धनंजय धुळगुंडे, प्रवीण करे, देवानंद शिंदे, पोपट मदने, बाबासाहेब वाघमारे, सतीश लोकुर, नंदलाल तुपे, सुफियान शेख, तुषार आरने, किसन कोळपे, सुनील गडदे, विठ्ठल मदने, अतिष आलटे, हिना खान, देवा परदेशी, चेतन शिरोळे, राजू पवार, भरत मोरे, प्रकाश देवकते, सौरभ महाडिक, इस्माईल रंगरेस आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजवर या मतदारसंघातून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी आपली निष्क्रियता दाखवून हडपसरमधील मतदारांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे आता जनता मतदानाच्या दिवसाची वाट पहात आहे. मतदारसंघात परिवर्तन निश्चित असून, येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घनश्याम हाके हे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.





