जागतिक टपाल दिन: बदलता काळ आणि बदललेली टपाल तिकीटं!

Updated On:

भारत स्वतंत्र्य झाल्यापासून ते आजपर्यंत टपाल तिकीटांच्या स्वरुपात, आकारत. रचनेत विविध बदल झाले आहेत.त्यांच्यातील या बदलांमुळे त्या त्या काळाविषयी माहिती मिळते. टपाल खाते नेत्यांवर, फुलांवर , प्राणी पक्षांवर एखाद्या घटनेवर एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सवी,शतक, द्विशतक किंवा त्रिशतक निमित्त तिकीटं काढते.1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्यावेळी पोस्ट तिकीटात बदल करण्यात आला होता. त्या तिकीटावर तिरंग्याचे चित्र दिले होते. तर कधी इंदिरा गांधी, महात्मा गांधी, राजीव गांधी, सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या व्यक्तींच्या प्रतिमा टपाल तिकीटांवर विशिष्य काळात होत्या. यावरुन आपल्यास त्या काळात त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती मिळते. तसाच तो कालखंड देखील तिकीटांद्वारे समजायला सोपा जातो.त्याचमुळे टपाल तिकीटे हा इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहे.

1977मध्ये भारताने जाल कूपर यांचं टपाल तिकीट प्रसिद्ध केलं होतं .याचं कारणंही तसंच होतं. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातील  जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते.मुंबईत पारशी कुटुंबात यांचा जन्म झाला. इंडियाझ स्टॅम्प जर्नलचे संपादन केले होते. भारतातील पहिल्या तिकीट संपादक ब्यूरोचे ते संपादक होते.  त्यांनी इम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली होती. याच विषयावर त्यांनी पुढे पुस्तकही लिहीलं. त्यांच्या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरुप दिलं.

भारतीय टपाल तिकीटांच्या अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांच्या मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करुन जागतिक पातली गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान प्रचंड महत्वाचे आहे हे त्यांच्यावर काढलेल्या तिकीटांवरुन लक्षात येते. टपाल तिकीट संग्रह म्हणजे नवीन तिकीट प्रकाशित झालं की ते विकत घेत त्यांचा संग्रह करणे. काही टपाल तिकीटे ही विशिष्ठ वेळेसाठीच प्रकाशित करतात.

आणखी संबंधित बातम्या

PAN Card New Rules : महत्वाची बातमी ! सरकारने पॅन कार्डच्या नियमांत केले 'हे' 4 महत्वाचे बदल

2026-04-11 18:39:04

PAN Card New Rules :  महत्वाची बातमी ! सरकारने पॅन कार्डच्या नियमांत केले 'हे' 4 महत्वाचे बदल

Pune News : रमजान ईदनिमित्त पुण्यातील 'या' चौकातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

2026-03-20 16:53:58

Pune News : रमजान ईदनिमित्त पुण्यातील 'या' चौकातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल

Pune-Nashik railway : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला ब्रेक.! मूळ आराखड्यात होणार मोठे बदल? CM फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं....

2026-02-25 20:28:17

Pune-Nashik railway : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेला ब्रेक.! मूळ आराखड्यात होणार मोठे बदल? CM फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं....

Civil services exam : नागरी सेवा परीक्षा नियमावलीत काळानुरूप बदल; विद्यार्थ्यांच्या सवलतीबाबत केंद्राचे सूतोवाच

2026-02-04 19:16:17

Civil services exam : नागरी सेवा परीक्षा नियमावलीत काळानुरूप बदल; विद्यार्थ्यांच्या सवलतीबाबत केंद्राचे सूतोवाच

Election 2026 : जालन्यात भाजपकडून मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी; पूर्वीच्या भूमिकेत केला बदल

2026-01-02 15:37:16

Election 2026 : जालन्यात भाजपकडून मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी; पूर्वीच्या भूमिकेत केला बदल