नगर-मनमाड महामार्गावरील वाहतुकीत बदल

नगर – नगर- मनमाड या महामार्गाचे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे नगर-मनमाड रोडवरील विळद बायपासने पुनतांबा फाटा पर्यंत वाहतूकीचे नियमात तत्काळ बदल करण्यात आला आहे. त्यामुळे महामार्गावरील अवजवड वाहनास बंदी घातली आहे, असे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक असल्याने दि. १ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर पर्यंत आठ दिवसासाठी बदल करण्यात आला आहे. सध्या पावासाळा सुरु असून दुरुस्ती केलेल्या रस्त्यावरुन अवजड वाहने लगेच जात असल्यामुळे पुन्हा रस्ता खराब होत आहे. त्याचप्रमाणे या महामार्गावर शिडी येथे श्री साईबाबा मंदिर असून देशभरातून भाविक शिर्डी येथे येतात. दुरुस्तीचे कामादरम्यान अवजड वाहनांमुळे अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, या दृष्टीने नगर- मनमाड रोडवरील विळद बायपास ने पुनतांबा फाटा पर्यंत वाहतुकीचे नियमात बदल करण्यात आला आहे.
नगर-पुणे/सोलापुरकडून मनमाडकडे जाणारे वाहतुकीकरीता मार्ग- कल्याण बायपास चौक अहमदनगर कल्याण महामार्गावरुन आळेफाटा संगमनेर मार्गे नाशिक कडे, किंवा विळद घाट – दूध डेअरी चौक शेंडी बायपास अहमदनगर औरंगाबाद महामार्गावरुन कायगाव गंगापुर वैजापुर येवला मार्गे इच्छित स्थळी जातील. शनि शिंगणापुर, सोनई रोडवरुन वरुन मनमाड (राहुरीकडे) कडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतुक नगर- औरंगाबाद महामार्गावरुन इच्छित स्थळी जातील.
मनमाड येवला शिडी कडुन अहमदनगर मार्गे पुणे मुंबई कल्याण कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीकरीता मार्ग पुणतांवा फाटा, झगडे फाटा, सिन्नर, नांदुर शिंगोटे संगमनेर आळेफाटा मार्ग ततर मनमाड- येवला कडुन नगर-सोलापुर, बीडकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहतुकीकरीता मार्ग- पुणतांबा फाटा येथुन वैजापुर गंगापुर कायगाव प्रवरासंगम शेंडी बायपास विळद घाट केडगाव वायपास मार्ग. लोणी-बाभळेश्वर श्रीरामपुर कडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतुक वाभळेश्वर श्रीरामपुर टाकळीभान नेवासा मार्ग अहमदनगर प्रस्तुत आदेश सरकारी बस, अत्यावश्यक मालाची वाहतुक करणारी चाहने, रस्ता दुरुस्तीकरीता आवश्यक वाहने वस्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही,असे आदेशात म्हटले आहे.





