Nashik Namokar Teerth : णमोकार तीर्थावर फडणवीस, पटेल यांची उपस्थिती
Nashik Namokar Teerth : नाशिकच्या चांदवड येथील मालसाणे येथे सुरू असलेल्या जैन पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल पटेल यांनी हजेरी लावली.

Nashik Namokar Teerth : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील मालसाणे येथे सुरू असलेल्या जैन धर्मियांच्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचा दुसरा दिवस आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने भक्तांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे.
या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेलही उपस्थित होते. यावेळी जैन मुनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल पटेल यांना आशीर्वाद दिले आणि मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना पटेल म्हणाले, कुंथुसागर आणि देवनंदी महाराज यांचे दर्शन घेणाचे भाग्य लाभले. पवित्र आणि शुद्धता या णमोकार तीर्थावर आहेत. दिगंबर समाज संख्येने कमी असला तरी देश घडविण्यात अग्रेसर समाज आहे. कोणत्याही क्षेत्रात दिगंबर जैन समाज पुढे आहे.
आपल्या धर्मगुरूचे आशीर्वाद आहेत, ते अनवाणी चालतात, त्याग करतात. अशा आपल्या गुरुजनांना नमस्कार करतो. यावेळी णमोकार तीर्थक्षेत्रसाठी राज्य सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी मी करतो, असे पटेल म्हणाले.
या महोत्सावासाठी प्रशासनातर्फे कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून सुरू असणाऱ्या या महोत्सवात आज सकाळी 6.30 वाजल्यापासून यज्ञशाळेत अभिषेक आणि हवनाने दिवसाची सुरुवात झाली आहे.





