Chandukaka Saraf Jewels : चंदुकाका सराफ ज्वेल्सची ‘लख लख सोनेरी’ विशेष ऑफर; दसरा-दिवाळीत सोन्याची झळाळी
Chandukaka Saraf Jewels : चंदुकाका सराफ ज्वेल्सची ‘लख लख सोनेरी’ दसरा-दिवाळी ऑफर १५ नोव्हेंबरपर्यंत. सोन्याच्या दागिन्यांवर ३.९९% ते ९.९९% मजुरी, हिऱ्यांवर १००% पर्यंत आणि चांदीवर ३०% सूट.

Chandukaka Saraf Jewels : सणासुदीच्या आनंदाला सोन्याची झळाळी देण्यासाठी चंदुकाका सराफ ज्वेल्सने ग्राहकांसाठी ‘लख लख सोनेरी’ ही विशेष दसरा-दिवाळी ऑफर जाहीर केली आहे. ‘सण आनंदाचा, साज सोन्याचा’ या संकल्पनेतून ही ऑफर सादर करण्यात आली असून, सोन्या, हिऱ्यांच्या तसेच चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना विशेष लाभ मिळणार आहेत.
या विशेष ऑफरअंतर्गत सोन्याच्या दागिन्यांवर मजुरी ३.९९% ते ९.९९% प्रति ग्रॅम ठेवण्यात आली आहे. तसेच हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर १००% पर्यंत सूट देण्यात येणार आहे. याशिवाय चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट ३०% सूट मिळणार आहे. त्यामुळे पारंपरिक दागिन्यांसोबतच आधुनिक डिझाइनच्या दागिन्यांची खरेदीही ग्राहकांना अधिक फायदेशीर दरात करता येणार आहे.
चंदुकाका सराफ ज्वेल्सची ही विशेष ऑफर १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या सर्व शाखांमध्ये या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. दसरा-दिवाळीचा सण, लग्नसराई आणि विविध शुभमुहूर्त लक्षात घेता ग्राहकांना आपल्या आवडीचे दागिने खरेदी करण्याची ही संधी असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
“सणांचा आनंद आणि सोन्याची परंपरा यांचा सुंदर संगम साधत ग्राहकांना अधिक मूल्य देणे हा आमचा उद्देश आहे. ‘लख लख सोनेरी’ ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांच्या प्रत्येक खास क्षणाला सोन्याची झळाळी मिळावी, हीच आमची भावना आहे,” असे चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या व्यवस्थापनाने सांगितले.
दरम्यान, ही मर्यादित कालावधीसाठी असलेली विशेष ऑफर असून, ग्राहकांनी त्याचा लाभ घेऊन आपल्या आवडीचे सोन्याचे, हिऱ्यांचे आणि चांदीचे दागिने खरेदी करावेत, असे आवाहन चंदुकाका सराफ ज्वेल्सतर्फे करण्यात आले आहे.





