Chandukaka Saraf : चंदुकाका सराफच्या नवीन स्टोअरचा पनवेलमध्ये भव्य शुभारंभ

पनवेल : १९८ वर्षांची समृद्ध परंपरा असलेली चंदुकाका सराफ ही नामांकित सुवर्णपेढी आता पनवेलमध्ये आपले नवे स्टोअर घेऊन येत आहे. शुक्रवार, दि. ४ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नील हेर्मिटेज, सुरूची हॉटेलजवळ, पनवेल येथे या स्टोअरचा भव्य शुभारंभ होणार आहे. या निमित्ताने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणि खास संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विशेष ऑफर्स आणि बक्षिसांची संधी
चंदुकाका सराफच्या नव्या स्टोअरमध्ये ४ ते ९ जुलै २०२५ या कालावधीत ग्राहकांना खरेदीवर आणि गुंतवणुकीवर खास ऑफर्स मिळणार आहेत. ३०,००० रुपये किंवा त्याहून अधिक खरेदी किंवा ३,००० रुपये किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना महिंद्रा थार किंवा ज्युपिटर बाइक जिंकण्याची संधी आहे. याशिवाय, सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १०% सूट आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर १००% पर्यंत सूट देण्यात येणार आहे. या ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना या कालावधीत स्टोअरला भेट देण्याचे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार शहा आणि संचालक सम्यक किशोरकुमार शहा यांनी केले आहे.
ग्राहकांसाठी आवाहन
चंदुकाका सराफच्या नव्या स्टोअरला भेट देऊन आकर्षक दागिने खरेदी करण्याबरोबरच महिंद्रा थार आणि ज्युपिटर बाइक जिंकण्याची अनोखी संधी मिळवा, असे आवाहन पेढीच्या व्यवस्थापनाने केले आहे. ऑफर्सशी संबंधित नियम आणि अटी लागू असतील. अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांक १८०० २६७ ८५५५ वर संपर्क साधावा.





